in

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. महाराष्ट्रात अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी २०१४ ते २०१९ चा काळ प्रचंड खडतर राहिला. मात्र, त्यातून मुसंडी मारत महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने स्वतः अस्तित्वाची जाणीव करून दिली.

कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले तरी कोरोना नियमांचे पालन करूनच ते पार पाडले जातील. दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. सत्तेत आल्यावर राष्ट्रवादीने पक्ष वाढीवर भर दिला. पुणे पदवीधर मतदारसंघातील विजय आणि सांगली महापौरपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाने मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला. कोरोनाचे संकट निवळल्यावर होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; खबरदारीसाठी NDRFची टीम तैनात

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत महत्वाची बातमी!