in

नागपूर : ऑक्सिजन न मिळाल्याने कन्हान परिसरात चौघांचा मृत्यू…

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपुरातील कन्हान-कादरी परिसरातील जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन संपल्याने चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे कोविड सेंटर दोन दिवसांपूर्वीच सुरू झाले होते.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या कोरोना सेंटरचे उद्घाटन झाले होते.

आज ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अत्यवस्थ असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे. मृत्यूची बातमी समजताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Election | निवडणूक आयोगाची भाजपा नेत्यावर मोठी कारवाई

राज्यात पावसाची शक्यता