in

मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून १२ उच्चशिक्षित महिलांची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. महेश उर्फ करण गुप्ता असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव असून तो 32 वर्षीय आहे. हा भामटा जीवनसाथी या मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून टोपण नावाने अकाउंट तयार करून त्यात बिजनेस मॅन असल्याचे सांगून उच्चशिक्षित महिलांना लग्नाची मागणी घालत असे ज्या महिला त्याला संपर्क करत असे त्यांना मॉल, रेस्टॉरंट मध्ये बोलावून त्यांच्याशी जवळीक साधत, संधी मिळताच विनयभंग किंवा शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा.

आता पर्यंत या भामट्याने 10 ते 15 महिलांवर लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. काही काळ हॅकरचे काम करणारा हा भामटा एका वेळी एकचं सिमकार्ड वापरत असे. यामुळे मागील चार महिन्यांपासून पोलिसांच्या हाती हा भामटा लागत नव्हता. मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणाऱ्या अश्या भामट्यां पासून सावध राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केल आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कृतीतून मराठ्यांची शक्ती दाखविण्याची हीच वेळ – राधाकृष्ण विखे पाटील

‘उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’