in

‘१८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देणार’

२१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यास सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला करोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल असे पंतप्रधाना मोदींनी शुक्रवारी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -१९ फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी उपस्थित होते.

यावेळी, “२१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ४५ वर्षावरीस पुढील वयोगटाप्रमाणे १८ वर्षावरील नागरिकांना देखील मोफत लस मिळणार आहे,” असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाची लस घ्या सोन्याच्या वस्ताऱ्यानं दाढी, कटींग मोफत करा

OBC आरक्षणासंबंधी विजय वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती