in

French Open: नाओमी ओसाकाची स्पर्धेतून माघार

जगातील दुसर्‍या क्रमांकाची महिला टेनिसपटू जपानच्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे पहिली फेरी जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश करूनसुद्धा तिने हं निर्णय घेतल्याने सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत. तसेच तिने घेतलेल्या माघारी मागचे खर कारण समोर आले नाही आहे.

फ्रेंच ओपनमध्ये ओसाकाने शानदार सुरुवात केली आणि रोमानियाच्या पेट्रिशिया मारिया टिगचा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. ओसाकाने १ तास ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६३व्या क्रमांकावर असलेल्या पेट्रीशियाला ६-४, ७-६ (४) असे पराभूत केले.

पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले, त्यामुळे तिला १५,००० डॉलर्सचा दंड बसला. या कारवाईनंतर ओसाकाने स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले. यावर ओसाका म्हणाली, “मी माघार घेते, कारण मला वाटते, की या स्पर्धेसाठी आणि इतरांसाठी ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इतर खेळाडू पॅरिसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकतील. मी कधीही विचलित होऊ इच्छित नाही. माझी वेळ चांगली नव्हती आणि माझा संदेश अधिक स्पष्ट होऊ शकला असता. महत्त्वाचे म्हणजे मी कधीही मानसिक आरोग्यास तुच्छ मानणार नाही.”

पुढे ती म्हणाली, ”मी आता काही काळ कोर्टापासून दूर राहील. परंतु जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा मला खरोखर टूरसोबत काम करण्याची इच्छा आहे. आशा आहे की आपण सर्वजण निरोगी व सुरक्षित राहाल. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि तुम्हाला लवकरच भेटेन.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा

“म्हणून ती चांगली आई होऊ शकत नाही, असा निकष लावू नये”