in

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत छत्री तलाव परिसरात फ्रेंडशीप-डे साजरा

कोरोनाचे भान विसरून आज शकडो युवक युवतींनी छत्री तलाव परिसरात धुमधडाक्यात फ्रेंड शिप-डे साजरा केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
यंदाचा फ्रेंडशिप डे हा रविवारी आल्यामुळे शहरातील अनेक तरुण तरुणी छत्री तलाव परिसरात एकत्र येत साजरा केला. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवसांपासून सर्व मित्र मैत्रिणींना भेटणं शक्य होत नव्हतं.

मात्र, आता कोरोनाचा संसर्ग हा कमी झाल्याने युवक युवतींनी धुमधडाक्यात आजचा दिवस साजरा केला. मात्र यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र छत्री तलाव परिसरात पहावयास मिळाले अनेक युवतींनी तोंडाला मास्क बांधलेला नव्हता. तर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात व्यापारी संघाची बैठक; दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी

Maharashtra Covid Update | राज्यात दिवसभरात ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित; १५७ रुग्णांचा मृत्यू