in

1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत

लोकशाही न्यूज नेटवर्क | देशभरातील वाढत्या एटीएम घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने मोठे पाऊल उचललेय. 1 फेब्रुवारी 2021 पासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमवी एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. म्हणजेच आपण ईएमव्ही नसलेल्या मशिनमधून पैसे काढू शकणार नाही.

पीएनबीने केले ट्विट

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले की, आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पीएनबी ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनमधून 01.02.2021 पासून व्यवहार करण्यापासून बंदी घालेल.

ईएमव्ही मशीनशिवाय व्यवहार करू शकणार नाही

बँकेने म्हटले आहे की, वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पीएनबीने हे पाऊल उचललेय. जेणेकरून ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतील. 1 फेब्रुवारीपासून ईएमव्हीशिवाय ग्राहक एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.

EMV नॉन एटीएम म्हणजे काय?
EMV नॉन एटीएम असे असतात, ज्यात व्यवहाराच्या वेळी एटीएम कार्ड मशीनमध्ये जास्त काळ ठेवावे लागत नाहीत. यात डेटा चुंबकीय पट्टीद्वारे वाचला जातो. याशिवाय EMV एटीएममध्ये व्यवहार होईपर्यंत काही सेकंदांसाठी कार्ड लॉक स्वरूपात ठेवावे लागते.


बँकेनं नुकतीच ही सुविधा दिली
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना पीएनबीने अ‍ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू/बंद करण्याची सुविधा दिली आहे. आपण आपले कार्ड न वापरल्यास आपण ते बंद करू शकता. असे केल्याने आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात आगीचे सत्र सुरूच, २ आठवड्यांत ४ मोठ्या दुर्घटना

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज