in ,

‘हम दो हमारे दो’ चा मजेशीर ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनसध्या त्यांच्या आगामी ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटाबदल प्रेक्षक उत्साही आहेत. आता या चित्रपटाचा हटके ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील राज कुमार आणि क्रितीच्या केमिस्ट्रिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसंच यात कॉमेडीचा तडकाही देण्यात आला आहे. या चित्रपटात क्रितीला इम्प्रेस करण्यासाठी राज कुमार भरपूर कष्ट करताना दिसेल.

ट्रेलरमध्ये क्रितीला आई-वडील असलेल्या कुटुंबात लग्न करायचे असते. मात्र राज कुमारचे कुटुंब नसतं त्यामुळे तो खोट्या आई-वडिलांच्या शोधात असतो. यात परेश रावल आणि रत्ना पाठक शाह राजकुमारच्या खोट्या आई- वडिलांची भूमिका साकारताना दिसनार आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे क्रिती आणि राज कुमारच्या आयुष्यात एक नवीन वळण येईल.

हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते आता या चौघांची दमदार केमिस्ट्रि पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. क्रीतीने हा ट्रेलर इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. ‘आमच्या ट्रेलरसोबत तुमची दिवाळी होणार फॅमिली वाली’, आशयाचे कॅप्शन दिले आहे. क्रिती सेनॉन आणि राज कुमार व्यतिरिक्त चित्रपटात परेश रावल, अपारशक्ती खुराना, रत्ना पाठक आणि प्राची शाह देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. तसंच हा चित्रपट दिवाळी दरम्यान म्हणजेचं नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

superman biasexual : सुपरमॅन आता बायसेक्शुअल रूपात

सेनेच्या कार्यक्रमात निर्बंध कुठे जातात?; शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मनसे आक्रमक