in

गजानन काळेंच्या अटकेसाठी गृहमंत्र्यांची भेट घेणार; शिवसेना व राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आक्रमक

सिद्धेश म्हात्रे । मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे Gajanan Kale यांच्या पत्नीने त्यांच्याविरोधात मानसिक आणि शारीरिक छळ प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. मात्र तक्रारीच्या दोन दिवस उलटून सुद्धा अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही आहे. त्यामुळे या प्रकरणात आता शिवसेना व राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्नीची भेट घेत गजानन काळे यांच्या अटकेसाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गजानन काळेंवर Gajanan Kale पत्नी संजीवनी यांनी मानसिक आणि शारीरिक छळासह, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तसेच गजानन काळे Gajanan Kale यांनी मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांना लुबाडून पैसे कमावल्याचा गंभीर आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे. मनसे शहराध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर अक्षरशः बायकोच्या जीवावर उदरनिर्वाह करणारा साधा पदाधिकारी, आज करोडोंचा मालक कसा झालाय, असा सवाल संजीवनी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान गजानन काळे Gajanan Kale यांच्यावर पत्नी संजीवनी काळे यांनी गुन्हा दाखल करून 2 दिवस उलटले तरी देखील अद्याप पोलिसांनी काळे याला अटक केली नाही. या प्रकरणात आता शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आणि राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता मोंडकर यांनी संजीवनी काळे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या या घटनेचा निषेध केला तसेच संजीवनी काळे यांना धीर दिला.

यावेळी संजीवनी काळे यांनी गजानन काळे Gajanan Kale यांना लवकरात लवकर अटक करा अन्यथा जास्त वेळ निघून गेल्यास काहीही घडू शकते अशी भीती व्यक्त केली यासोबतच पोलिसांची भूमिकाही पारदर्शक नसल्याची भावना संजीवनी काळे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान आता संजीवनी काळे यांची छळवणूक करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या गजानन काळेला Gajanan Kale लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊ असा इशारा शिवसेनेच्या जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आणि राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता मोंडकर यांनी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bharat Biotech Nasal Vaccine | तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यास मंजुरी

‘संसदेतील शहाणे लोक बेफाम का होतात?’