in

मनसेच्या गजानन काळेला अटक होणार? पत्नीची ‘कृष्णकुंज’वर धाव

मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. यासंबंधी त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार देखील केली होती. तसेच काळे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही सांगितलं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर यावर सुनावणी पार पडली. या संपूर्ण प्रकरणात गजानन काळे यांना ठाणे सत्र न्यायालयाने दणका दिला आहे.

गजानन काळे यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला असून नवी मुंबई पोलीस व वकिलांनी योग्य बाजू मांडल्याने हे साध्या झाल्याचे सांगण्यात आले.

जीवाला धोका असल्यामुळे जामीन अर्ज फेटाळावा अशी साक्ष संजिवनी काळे यांनी कोर्टात दिली. त्यानंतर कोर्टाने गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मागील दहा दिवसांपासून गजानन काळे फरार आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने मानसिक, शिवीगाळ व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार केली होती.

गजानन काळे यांच्या पत्नी संजिवनी काळे यांनी न्यायासाठी कृष्णकुंजवर धाव घेतली आहे. गजानन काळे यांना अटक करण्यात यावी, यासाठी राज ठाकरे यांची संजिवनी काळे यांनी भेट घेतली आहे. गजानन काळे यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात संजिवनी काळे या राज ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहेत. परंतु, राज ठाकरे हे सध्या पुण्यात आहेत. त्यामुळे संजीवनी काळे आपले गाऱ्हाणे शर्मिला ठाकरे यांच्याकडे मांडले.

या निर्णयानंतर आता लवकरच गजाजन काळेला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचे उत्तर

मिलिंद सोमणची ‘मुंबई ते गुजरात’ पायी यात्रा