in

ATMमधून पैसे चोरणाऱ्या टोळीला बिहारमधून अटक

संजय राठोड | यवतमाळ : यवतमाळमध्ये एटीएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे उडविणार्‍या टोळीला अखेर अटक करण्यात आली. सायबर सेलच्या पथकाने तांत्रिक कौशल्याच्या सहाय्याने बिहार राज्यात जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये खात्यातून पैसे गेले याची तक्रार पोलिसांना दिली, असे एकूण २१ गुन्हे दाखल झाले असता एटीएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला सायबर सेलच्या पथकाने बिहार राज्यात जाऊन पकडले. त्यांच्याकडून एटीएम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. सुकेशकुमार अनिल सिंग (जि. गया), सुधीलकुमार निर्मल पांडे (जि. गया, बिहार), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे आरोपी यवतमाळमध्ये दोन वेळा येवून गेले होते. हे आरोपी एटीएम मशीनच्या आतमधे डीवाईस लावायचे त्या नंतर कोणीही या एटीएम मशीनमध्ये आपले कार्ड टाकले असता ते कार्ड डीवाईसच्या साह्याने कॉपी होत असे आणि त्या नंतर त्या कार्डची कोपी बनवून पैसे चोरले जात.
दरम्यान सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करीत थेट बिहार गाठले. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून दोघांच्या ताब्यातून इंटरर्नल एटीएम स्कॅनर, हॅन्ड एटीएम स्कॅनर, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर, 15 एटीएम व रोख रक्कम असा एकूण एक लाख 28 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

MIDCबंद कंपनीतील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक