in

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मुलीवर सामूहिक बलात्कार

पुण्यात एकीकडे कोरोनाचा मोठा विस्फोट होत असताना आता बलात्काराच्याही घटना वाढत चालल्या आहेत. वारजे परिसरात मुलीच्या मित्रांनीच वाढदिवसाच्या पार्टीला नेण्याच्या बहाण्याने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेत मुलीने विरोध केल्यावर तिच्यावर चालवण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळीने हा प्रकार उघडकीस आला. दत्तवाडी पोलिसांनी या घटनेत पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडे पिस्तुल कुठून आला याची चौकशी सुरू आहे.

जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. 15 दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने आपल्याला एका मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून तिला वारजे परिसरात नेले. त्याठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर एका खोलीत नेऊन पीडित मुलीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेली मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता आरोपींनी तिला आणखी दोघे येणार असल्याने घरी जाण्यास विरोध केला. तरीही पीडित मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता एका आरोपीने तिच्या छातीच्या दिशेने गोळी झाडली. मात्र ही गोळी मुलीच्या मोबाईलवर लागल्याने तिला गंभीर दुखापत झाली नाही. आरोपींनी त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलीला तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले.

विशेष म्हणजे या घटनेत गोळीबार झाल्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळाली. दत्तवाडी पोलीसांना पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कर्जत ते नेरळ रोडवर अपघातात अचानक स्फोट, 4 जण जागीच ठार

Dehu Beej Sohala; देहूच्या वेशीवर विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांचं आंदोलन