in

गंगुबाई काठियावाडीचा टिजर रिलीज, जाणून घ्या कोण होत्या गंगुबाई

संजयलीला भंसाली यांचा गंगुबाई काठियावाडी या सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती, अखेर या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमात आलिया भट्ट या लीड रोल मध्ये आहे. ती गंगुताई काठियावाडी यांची भुमिका करत आहे. टिझर रिलीज झाल्या नंतर या सिनेमातील आलिया भट्टच्या एक्टींग संदर्भात चर्चा सुरु झाली आहे.

कोण होती गंगूबाई काठियावाडी

गंगूबाई काठियावाडी गुजरातच्या काठियावाडची राहणारी होती म्हणून तीचं नाव गंगूबाई काठियावाडी ठेवण्यात आलं होतं. तीचं खरं नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होतं. तिच्या जीवनावर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. गंगूबाई वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या वडिलांकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या, मात्र कुठुंबातील लोक लग्नाला मान्य करणार नाही म्हणून त्यांनी पळून लग्न केलं आणि त्या मुंबईत आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी ज्या मुला बरोबर लग्न केलं होतं त्यांने गंगुबाईला 500 रुपयात विकलं. ही तीच्या जीवनात अतिशय वाईट घटना घडली त्यांनी या व्यवसायातून बाहेर निघण्याचा खुप प्रयत्न केला मात्र मुंबई कोणीही ओळखीचं नाही, इथून पळून पण जाणार कुठे असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर होतं अखेर त्या ज्या व्यवसायात आहेत त्यांनी त्या व्यवसायाला मान्य केलं आणि ते जगू लागल्या. मात्र एक दिवस त्यांच्याकडे डॉन करीम लालाच्या एका व्यक्तींन त्यांच्यावर बलात्कार केला. त्यात त्यांची परिस्थिती खुप बिघडली होती त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातून डिचार्ज मिळाल्यानंतर त्या थेट करीम लालला भेटायला गेल्या आणि त्यांच्या सोबत घडलेल्या सगळा प्रकार त्यांनी सांगितला, करीम लालाने त्यांना मदतीचं आश्वासन दिलं त्यांनतर गंगुबाईंनी त्यांना राखी बांधली आणि पुन्हा कधी त्या व्यक्तीने त्यांच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला तर ते त्याला चांगली शिक्षा देतील असं सांगितलं त्यानंतर तो व्यक्ती पुन्हा गंगुबाईंकडे आला यावेळीस मात्र गंगुबाई शांत न बसता त्यांनी करीम लालपर्यंत ही माहिती पोहोचवली आणि करीमलाल ने त्यांना मदत केली. त्यानंतर मुंबईत त्यांना फिमेल डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पॉवरचा सकरात्मक उपयोग करुन रेडलाईट भागात काम करणाऱ्या अनेक महिलांना न्याय मिळवून दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकण रेल्वेचा प्रवास होणार आणखी वेगवान

स्कूटरवर स्वार होऊन दीदींकडून इंधन दरवाढीचा निषेध…