आज दुपारच्या सुमारास शहरातील सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळतीची घटना घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. नुकतीच पुण्यातील फॅशन स्ट्रीटला आग लागून 600 हून अधिक दुकानं जळाली होती. त्यानंतर आता या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
शहरातील गरवारे महाविद्यालयाजवळ सेंट्रल मॉल आहे. मॉलमधील लोकांना डोळे, कान, नाक आणि घशामध्ये जळजळ होण्याचा त्रास होऊ लागला. यानंतर मॉलच्या पार्कींगमध्ये धूर झाल्याची माहिती दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही मिनिटांमध्ये घटनास्थळी धाव घेऊन पार्किंगमध्ये पाहणी केली. या पहाणीमध्ये पार्किंगच्या एका कोपऱ्यात गॅस सदृश्य वस्तू आढळून आली. या वस्तूमधून होणाऱ्या गॅस लिकेजमुळेच नागरिकांना त्रास होत असल्याचं स्पष्ट झालं.
अखेर मॉलमधील ३०० जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे. गॅसगळतीसंदर्भात दुरुस्ती सुरू असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे.
Comments
Loading…