in

गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून

माजी क्रिकेटर आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना मिळालेल्या धमकीच्या मेलची पाळंमुळं पाकिस्तानात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासणीतून समोर आलाय. या मेलमध्ये गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा मेल पाकिस्तानातून धाडला गेल्याचा खुलासा झालाय.

दिल्ली पोलिसांनी ‘गूगल’कडे या मेलसंबंधी माहिती मागितली होती. गूगलनं दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई मेल पाकिस्तानातून धाडण्यात आला आहे. हा मेल ज्या सिस्टममधून धाडम्यात आला त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानात आढळला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सेनगाव गाव औंढा नागनाथ नगरपंचायतीचा वाजला बिगुल

दीड वर्षानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय