in

पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अखेर मिळालं कुटुंब

पाकिस्तानातून भारतात परतलेल्या मूकबधीर गीताला आपलं कुटुंब मिळालं आहे. गीताच्या आईचं नाव मीना असं असून ते महाराष्ट्रातील नायगाव येथील रहिवासी आहेत. गीताचं खरं नाव राधा वाघमारे असं आहे.

गीताला तिचे खरे पालक शोधण्यासाठी जवळपास ५ वर्ष लागली. डीएनए चाचणीद्वारे पालकांची पुष्टी झाली आहे. काही वर्षांपूर्वी गीताच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आई मीना हिनं दुसरं लग्न केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

देशभरातील जवळपास २० कुटुंबांनी गीता आमची मुलगी असल्याचा दावा केला होता. मात्र, यातील कोणााचाही दावा तपासात सिद्ध झाला नाही. गीता ही लहानपणी रेल्वेगाडीत बसून २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्सप्रेसमध्ये आढळली होती. तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नामुळे २६ ऑक्टोबर 2015 रोजी ती भारतात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmer Protest | 26 मार्चला भारत बंदची घोषणा, आंदोलन अधिक तीव्र होणार

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सरसंघचालकांच्या भेटीला