in

गेट २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

गेट 2021 परीक्षेचा चा निकाल जाहीर झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने आज निकाल जाहीर केले. उमेदवार आपले स्कोरकार्ड अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर डाउनलोड करू शकतात. उमेदवार केवळ गेट स्कोरकार्ड वापरू शकतात जे जारी होण्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी वैध असते. 30 जूनपर्यंत गेट स्कोअर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध असेल. मात्र त्यानंतर, जुलै ते डिसेंबर या कालावधीत ते डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागेल.

यावर्षी एकूण 7,11,542 उमेदवारांनी गेट 2021 ची परीक्षा दिली. यापैकी, एकूण 1,26,813 उमेदवार म्हणजेच सुमारे 17.82% उमेदवार पात्र ठरले. उत्तीर्ण होणा-या एकूण उमेदवारांपैकी 98732 पुरुष आणि 28081 महिला उमेदवार आहेत. कोरोना विषाणू साथीच्या रोगामुळे सुरक्षा व्यवस्थेची दखल घेऊन ५ आणि १२ फेब्रुवारी या अतिरिक्त दिवशी ही परीक्षा घेण्यात आली. 6, 7, 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश करणार

Ind Vs Eng | रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय