in ,

शेतकऱ्यांना 10 एकरात 100 कोटीची वांगी लावण्याचा मंत्र द्या; भाजपाचा सुप्रिया सुळेंना सल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ७० दिवस उलटून गेलेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळ्यानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे. आता विरोधी पक्षातील खासदारांचं शिष्टमंडळ देखील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार होतं. मात्र, या शिष्टमंडळाला गाझीपूर बॉर्डरवर रोखण्यात आल्याचं समजत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत. यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र देखील सोडलं आहे. ‘हे सरकार अतिशय असंवेदनशील असून आम्हाला रोखणं हे धक्कादायक आहे असं त्या म्हणाल्या आहेत.

तर, ‘शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता दोन महिने झाले आहेत. तरीही त्यांना न्याय मिळत नाही. बॉर्डरवर देखील अशी स्थिती नाही. पाकिस्तान, चीन बॉर्डरला मी गेले आहे. तिथे ही अशी परिस्थिती नाही. मात्र, येथे अशी धक्कादायक परिस्थिती आहे. हे आमचे शेतकरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करु दिली जात नाही. त्यांना भेटू दिले जात नाही, याला काय म्हणावे?,’ असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळेंच्या या टीकेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आपल्या तीर्थरुपांना जे कायदे करायचे मनात होते पण जमले नाही ते कायदे मोदी सरकारने करून दाखवले. तरीही विरोधासाठी विरोध करायचा असेल तर गाजीपुर बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी जरूर जा परंतु तिथे त्यांना १० एकरात १०० कोटीची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या.’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पश्चिम बंगालमधील भाजपच्या रथयात्रेची सुनावणी ५ फेब्रुवारीला कलकत्ता उच्च न्यायालयात होणार

दिल्ली पोलिसांकडून पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR?