in

सोन्याला तेजी, जाणून घ्या आजचे दर

आठवड्याभरापासून सोने स्वस्त झालेले पाहायला मिळत होते. परंतु आज स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी 11:57 वाजता 138 रुपयांची तेजी होऊन प्रती 10 ग्रॅम 46,335 रुपयांपर्यत गेला होता. या व्यतिरिक्त जागतिक बाजारात सोमवारी सुरूवातीला सोन्याच्या वायदे आणि हाजीर किंमतीत वाढ दिसून आली.

तर दुसरीकडे, चांदीच्या किमतीत देखील तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्सवर मार्च 2021 च्या चांदीचा भाव सकाळी 12:09 वाजता 416 रुपये म्हणजे 0.60 टक्के तेजीसह 69,428 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. त्याचबरोबर मे २०२१ च्या चांदीचा दर 401 म्हणजे 0.57 टक्क्यांच्या घटीसह 70,560 रुपये प्रतिकिलो होता. त्याचबरोबर जागतिक बाजारात सोमवारी सकाळी चांदीचे दोन्ही वायदा आणि हाजीर भाव वाढले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने चांदीचे भाव :

सोमवारी सकाळी सोन्याचे जागतिक बाजारातील भाव कॉमेक्सवर 0.26 टक्क्यांनी किंवा 4.70 डॉलरच्या तेजी सह 1,782.10 डॉलर प्रति औंसची पातळी असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त, सोन्याच्या जागतिक स्पॉट किमतीची किंमत प्रति औंस 1,784.93.3 डॉलरवर असल्याचे दिसून आले. यावेळी 0.04 टक्के किंवा 0.68 डॉलर वाढ झाली.

तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च 2021 वायदा भाव 0.25 डॉलर म्हणजे 0.47 टक्के घटीसह 27.54 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाण्यात ‘Lokशाही’च्या रिपोर्टरला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

पुण्यात PMPMLच्या धावत्या बसने घेतला अचानक पेट