in

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त

सोने-चांदी दरात आज तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर फ्यूचर ट्रेड 382 रुपयांच्या वाढीसह 46,118 रुपयांवर पोहचला आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दारात बदल पाहायला मिळाला आहे . चांदीचे दारात 889 रुपयांच्या तेजी झाली असून 68,150 रुपयांवर आहे. दरम्यान सोने दरात गेल्या आठ महिन्यातील निच्चांकी स्तरावरून आता काहीशी रिकव्हरी पाहायला मिळत आहे.

त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात आज तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यवसाय 15.95 डॉलरच्या वाढीसह 1,750.17 डॉलर प्रति औंस रेटवर बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीही 0.21 डॉलरच्या वाढीसह 26.89 डॉलरच्या लेवलवर आहे.

दिल्लीत 1 मार्च 2021 रोजी सोने-चांदी दर

  • 22 कॅरेट गोल्ड रेट – 44810 रुपये
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव – 48910 रुपये
  • चांदीचा दर – 67510 रुपये

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील Blackout घातपात ?

शरद पवारांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस