in

सोनं झालं ९४०० रुपयांनी स्वस्त

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. याच पाश्वभूमीवर मागील काही दिवसांपासून सोने स्वस्त होताना दिसत आहे. बुधवारी सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. आज एक तोळा सोनं ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे.

तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. चांदीची किंमत १३५ रुपयांनी वाढली आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर ६९ हजार ५०७ रुपये प्रति किलो इतका होता. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज आठ महिन्यांमधील नीचांक पातळीवर सोन्याचे दर पोहचले आहेत.

सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. सध्या सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कावर १२.५ टक्के आयात कर द्यावा लागतो. त्यामध्ये पाच टक्के कपात झाल्यास तो ७.५ टक्क्यांवर येईल. सोनं आणि चांदीचे दर कमी होण्यामागे हे ही एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणेकरांनो 10 रुपयांत एसीमधून दिवसभर फिरा, पण पीएमपीएमएलकडे बस आल्यानंतर!

Coronavirus चा नवा वेरिएंट; ११ देशांतील शिरकावानंतर भारतात दहशत