in

Gold price | आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीनंतर सोन्यांचांदीच्या दरात घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत 1.5 टक्क्यांनी घसरुन 47,799 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर 1.6 टक्क्यांनी घसरून 70,345 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या संकेतानंतर सोन्यामध्ये 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आली होती. आशियाई बाजारात कालपेक्षा आज काही प्रमाणात कमी नुकसान झालं आहे आणि त्यामुळे गुंतवणुकदारांनी घसरणीचा फायदा उचलला आहे. याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढून 1,822.36 डॉलर प्रति औंस झाली आहे. याशिवाय अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी वाढून 27.09 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर प्लॅटिनमच्या दरात 0.5 टक्क्यांनी वाढ होऊन दर 1,127.49 डॉलर झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

घरोघरी लसीकरण; पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य

डॉक्टर दांपत्याला खंडणीसाठी धमकी