in

Gold Price Today| सोन्याच्या भावात वाढ, पाहा आजचे दर

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत बर्‍याच दिवसांच्या घसरणीनंतर चांगली वाढ झाली. यामुळे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला. त्याचबरोबर चांदीच्या दरात आज 1200 रुपयांपेक्षा जास्त वाढ नोंदविण्यात आली. यासह चांदी 66 हजार रुपये प्रति किलोवर गेली.

गेल्या सराफा व्यापारात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 46,610 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर चांदी 64,994 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीच्या किमती वाढल्यात.

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या भावात 10 ग्रॅम प्रति 382 रुपयांची वाढ झाली. यामुळे मौल्यवान पिवळे धातू प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. राजधानी दिल्लीत आज शुद्ध 99.9 ग्रॅम सोन्याची किंमत 46,992 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,817 डॉलर झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Facebook आणि Twitter बदलणार, पाहा काय होणार मोठा बदल

Local Restart । दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले…