in

पाहा आजचे सोन्याचे भाव

भारतात सध्या लग्नसराई सुरु झाली आहे. त्यातच सोन्याचे भावही कमी होत आहेत. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव 0.3% नी कमी होत 44,400 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळा 44,400 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत.

तर चांदीची वायदे किंमत 0.6% नी घसरून 65,523 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती कमी होऊन गेल्या काही महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 44,589 प्रति तोळावर पोहोचले होते.

सोन्याचे दर आता गेल्या 10 महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावरुन 12000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळा 56,200 या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्याचा आर्थिक पाहाणी अहवाल : उद्योग, सेवा क्षेत्रात घसरण तर, कृषी क्षेत्रातील चित्र आशादायी

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : गृहमंत्री कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? फडणवीस यांचा सवाल