in

सोने- चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बघता, भारतात सोमवारी, 18 ऑक्टोबर रोजी सोन्याचे भाव वाढले. आज, 18 ऑक्टोबर रोजी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांनी वाढून 47,265 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोमवारी चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47 हजार 265 रुपये आहे. त्यात 82 रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोने 47 हजार 312 रुपयांपर्यंत वाढले होते. आज एक किलो चांदीचा भाव 63 हजार 371 रुपये असून त्यात 219 रुपयांची वाढ झाली आहे.

देशातील वाढत्या मागणीमुळे एप्रिल ते सप्टेंबर 2021 दरम्यान सोन्याची आयात 24 अब्ज डॉलर्स झाली. मागील वर्षी याच काळात पिवळ्या धातूची आयात 6.8 अब्ज डॉलर होती. तर दुसरीकडे चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर दरम्यान चांदीची आयात 15.5 टक्क्यांनी कमी होऊन 619.3 दशलक्ष झाली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा महावितरण विरोधात एल्गार

मुंबईतील महाविद्यालय ‘या’ दिवशी सुरु होणार