in

Gold-Silver: सणाच्या दिवसात पण सोन्याचांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

एकीकडे पेट्रोल डिझेलच्या किंमती रोज वाढत आहेत तर दुसरीकडे मौल्यवान धातूची किंमत रोज घसरत चालली आहे.

काय आहे आजचा भाव?
आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,९१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,०६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,८९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,९१० रुपये इतका असेल. चांदी आज प्रती १० ग्रॅमचा दर ६०१ रुपये आहे

तर आता सोन्याचांदीचे दर माहित करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात या मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. तसेच आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Indian Airforce Day 2021 | भारतीय हवाई दल दिवस का साजरा करतात?

अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चीन आमने-सामने