in

Gold Silver Rate: सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण

मागील काही आठवड्यांपासून सोन्या चांदीच्या भावांमध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या किमती सतत खाली येत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याची किंमत 208 रुपयांनी घसरली आहे . वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीचे दर वाढलेत. एक किलो चांदीची किंमत 602 रुपयांवर गेलीय. रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत किमती आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोन्याची नवीन किंमत :
99 ग्रॅम शुद्धतेसह 10 ग्रॅम सोन्याची किंमत 208 रुपयांनी घसरून 44,768 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमती प्रति औंस 1730 डॉलरवर आल्या आहेत.

चांदीची नवीन किंमत :
दिल्लीमध्ये एक किलो चांदीची किंमत 602 रुपयांनी वाढून 68,194 रुपये झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची किंमत 26 औंस डॉलर प्रति औंसपर्यंत घसरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव कोणी रखडवलाय? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

…तेव्हा मला ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला, मुख्यमंत्र्यांची भाजपाच्या ‘या’ नेत्याला कोपरखळी