in

गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

उदय चक्रधर | महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत तर काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे.गोंदिया जिल्ह्यातून सकारात्मक बातमी येतेय.गोंदिया जिल्ह्यातील ९३४ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.जिल्ह्यात आता फक्त तीन कोरोनाचे अँक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती मिळतेय.गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत आहेत.

मागील दोन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता तीनवर आली आहे. जिल्ह्यातील ९३६ गावांपैकी ९३४ गावे पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना ॲक्टिव रुग्ण गोंदिया येथे होते. त्यामुळेच हा गोंदिया तालुका कोरोनाचे हॉटस्पॅाट झाला होता. मात्र, आता हा तालुकासुद्धा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केवळ दाेन गावांत कोरोनाचे तीन रुग्ण आहे. त्यामुळे हा तालुकासुद्धा लवकरच कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. हे रुग्ण बरा झाल्यास जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंत ४११९४ कोरोनाबाधित आढळले त्यापैकी ४०४८५ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आणि जिल्हावासीयांनी घेतलेली काळजी यामुळेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे म्हटल्यास वावगे होणार नाही. जिल्ह्यातील दोन रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने दोन रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने या दोन्ही गावांतील रुग्णांचे नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Salman Khan | एअरपोर्टवर झाली सलमान खानची अडवणूक

इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून कौतुक