in

कुत्र्याची बिबट्याने केली शिकार, चित्तथरारक घटना सीसीटिव्ही कैद

headlines, breaking news

उदय चक्रधर, गोंदिया
गोंदियात पोल्ट्री फार्म वर बांधलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना मोरगाव येथे घडली. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची चित्तथरारक घटना सीसीटिव्हीमाध्ये कैद झाली आहे. प्रकारामुळे परीसरात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने गुराख्यांना अनेकदा दिवसाढवळ्या दर्शन दिले. वनविभागाने या हिंस्र पशूंचा बंदोबस्त करवा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

शिवराम काशिराम लोधी (65) यांचा मोरगाव साझा 8च्या गट क्रमांक 358 मध्ये कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी लेब्रा जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी सातच्या सुमारास या पोल्ट्री फार्म वरील गडी जेवणाकरिता घरी गेले. साडेआठ वाजता पोल्ट्रीफार्मवर परतल्यावर त्यांना सदर कुत्रा मृत अवस्थेत आढळला. या कुत्र्याचे पोट पूर्णतः फाडलेल्या स्थितीत होते. लगेच त्यांनी पोल्ट्री फार्म मधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. सीसीटीव्ही फुटेज बघून ते चकित झाले. कुत्र्याला संध्याकाली सातच्या दरम्यान बिबट्याने ठार केल्याचे व्हिडिओ मध्ये समोर आले. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. सदर परिसर रामघाट जंगलाला लागून आहे. या जंगलात बिबट्यांची संख्या वाढत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भावना गवळी यांना ईडीनं पुन्हा बजावलं समन्स!

काल मुंबईत ‘शुन्य’ कोरोना मृत्यू नोंद