in

गुगलचं भन्नाट फीचर! आता विना इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येणार सर्व फाईल्स

गुगल ड्राईव्ह आता ऑफलाईन मोडसाठीही सुविधा देत आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये नव्या अपडेटची घोषणा केली आहे. युजर्स आता पीडीएफ ऑफिस फाईल्स आणि इमेज ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू शकतात. परंतु त्यासाठी युजर्सला फाईल्स आधीच ऑफलाईन वापर करण्यासाठी त्या मार्क कराव्या लागतील.

यामुळे युजर्स इंटरनेटशी कनेक्ट नसल्यासही ब्राउजरचा वापर करुन फाईल्स ओपन करण्याची परवानगी मिळते. 2019 मध्ये गुगलने एका अशा फीचरचं बीटा टेस्टिंग सुरू केलं.ज्यात युजर्सला वेबवर गुगल ड्राईव्हचा वापर करताना नॉन गुगल फाईल प्रकारांना ऑफलाईन उपलब्ध करण्याची परवानगी दिली. हे फीचर आता सर्व युजर्ससाठी रोल आउट करण्यात येत आहे.त्यामुळे आता कोणताही युजर इमेज आणि डॉक्यूमेंट सिलेक्ट करू शकतो, ज्याला ते ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू इच्छितात.

असा कराल वापर :

▪️ सर्वात आधी ड्राईव्ह सेटिंगमध्ये ऑफलाईन अ‍ॅक्सेस पर्याय अ‍ॅक्टिव्ह करणं गरजेचं आहे.
▪️ सेटअप प्रोसेस पूर्ण केल्यानंतर सपोर्टेड फाईलवर राईट-क्लिक करून ‘Available offline’ पर्याय दिसेल.
▪️ हे फीचर सर्व गुगल Workspace युजर्ससह Cloud Identity Free, Cloud Identity Premium, G Suite Basic आणि Business युजर्ससाठी उपलब्ध आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MNS| मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा घटस्फोट