in ,

“सरकार पैसे उधार घेऊन पगार करतं” – जितेंद्र आव्हाड

उल्हासनगरात सध्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जवळपास १२२ धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश मनहापालिकेने दिलेत.या कारवाईने धोकादायक इमारतींमधील रहिवासी धास्तावले आहेत. या रहिवाशांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

यावेळी इमारतींचं पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारनं १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. यावर बोलताना ‘सरकारकडे पैसेच नसून कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा आम्हाला पैसे उधार घेऊन करावे लागतायेत’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मी सरकारचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आलो असून तुमची व्यथा मी नगरविकास मंत्रालयापर्यंत पोहोचवेन आणि लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. तसंच निर्वासितांच्या शहरांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा विचार करण्याची गरज असून आपल्याला कोणीही बेघर करणार नाही याची मी हमी देतो, असंही आव्हाड पुढे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ashadi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लसीकरणावरून राजेश टोपेंचा केंद्रावर हल्लाबोल