in

सरकार माझी हेरगिरी करत आहे; संभाजीराजेंचा गंभीर आरोप

राज्यसभेतील भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाचे आरक्षण आणि इतर प्रश्नांसंदर्भात राज्यातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली . या भेटी नंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे या मागण्यांवर येत्या ६ जूनपूर्वी ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ. तेव्हा कोरोना पाहणार नसल्याचा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामूळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजें सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.पण संभाजीराजे यांनी या दौऱ्यादरम्यान नुकतेच एक ट्विट केले आहे. संभाजीराजे यांनी या ट्विटद्वारे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
या ट्विटमध्ये सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? संभाजीराजे म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. तसेच मला हेच लक्षात येत नाही की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Live Update | मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा

New IT Rules | Facebook आणि Google सारख्या वेबसाईटने अपडेट करण्यास सुरुवात