in ,

“राज्यपाल कंगनाला भेटतात, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही”

लोकशाही न्यूज नेटवर्क | तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी आंदोलकांना संबोधित करताना ते बोलत होते.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी एकवटले होते. या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठींबा होता. आंदोलक शेतकरी राज्यपालांना भेटून निवदेन देण्यासाठी राजभवनाकडे निघाले होते, मात्र त्यांना वाटेतच पोलिसांकडून अडवले होते. तसेच राज्यपाल देखील राजभवनात उपस्थित नसल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध करत,राज्यपालांना द्यायचे निवदेन फाडून टाकले.

राज्याचा कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. मात्र राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत, असा टोला पवारांनी राज्यपालांना लगावला.

पंतप्रधानांवरही शरसंधान

देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल सत्ताधार्यांना कवडीची आस्था नाही. ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रजासत्ताक दिन : राज्यातील 57 पोलिसांचा पदकांनी गौरव

पाकिस्तानवर आली पार्क गहाण ठेवण्याची वेळ