in

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षांची आरास…

आमलकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज द्राक्षाचे घड आणि विविध रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल रखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.रांजणगावचे विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे.

आज आमलकी एकादशी असल्याने श्री विठ्ठलास पांढरे वस्त्र परिधान केले आहे. तर रुक्मिणी मातेस चॉकलेटी रंगाची सिल्कसाडीचा पोशाख नेसण्यात आला आहे. त्याचबरोबर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, तसेच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे. आणि शेवंती, बिजली, गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आलीय. त्यामुळे विठ्ठल मंदीर व गाभारा खुलून दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देवेंद्र फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते असावेत’ संजय राऊतांचा टोला

Gold- Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या; पाहा आजचे दर