in

“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…” संजय राऊत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. “मुंबईत येऊन ममता बॅनर्जी उद्योगपतींना भेटल्या, मुंबईतील उद्योग बंगालात पळवायचा त्यांचा डाव आहे”,अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आता संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून भाजपाला खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, योगी आदित्यनाथ, गुजरातच्या मंत्रिमंडळाचा मुंबई दौरा याचीही आठवण त्यांनी भाजपाला करून दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “ममता बॅनर्जींनी जाताना सोबत काहीच नेले नाही हे उगाच ओरड करणाऱ्यांनी आणि मुंबईला ओरबाडणाऱ्यांना साथ देणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजपा विरोधासाठी विरोध करतो, हे ममतांच्या दौऱ्यातही दिसलं. मुंबईत येऊन उद्योगपतींना भेटण्यात गैर काय?”

एकीकडे काँग्रेसकडून ममता बॅनर्जींच्या “देशात यूपीए आहे कुठे?” या प्रश्नावर जोरदार आक्षेप घेण्यात आला, तर दुसरीकडे भाजपाकडून ममता बॅनर्जींच्या प्रत्यक्ष दौऱ्यावरच आक्षेप घेण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुसाट ट्रकची कार, बाईकसह दोघांना धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

Mumbai Weather : अवकाळी पावसानंतर मुंबईत दाट धुक्याची चादर