in

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.

एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणूक पुढील वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गृहराज्यात अचानक घडलेल्या या राजकीय घडमोडीमागील कारण मात्र अस्पष्ट आहे. रुपाणी यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारली होती.

भाजपने सहा महिन्यांत पाच  मुख्यमंत्री बदलले

२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर कितीही विरोध वा टीका झाली तरीही राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपने गेल्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपने मुख्यमंत्री बदलले आहेत.

उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपने दोन मुख्यमंत्री बदलले.

आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजप पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपने हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड के ली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.


What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Hemant Nagarale | घटनेचा छडा एका महिन्यात लावू

prabhadevi