in

हळपावत यांचा वैशिष्ट्यपूर्ण “गणेशमूर्ती संग्रह”

जामखेडचे पोपट संजय हळपावत वय ७७, अभ्यासक, मार्गदर्शक, शिवकालीन नाण्यांवर विशेष अभ्यास. हळपावत यांचा गणपती संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. जामखेडमध्ये स्थायिक असलेले पोपट हळपावत यांना लहानपणापासून विविध वस्तू जमवण्याचा छंद आहे. या ऐतिहासिक वस्तू जमवता-जमवता त्यांना वैविध्यपूर्ण गणेश मुर्तीही आढळून आल्या. सर्व एकत्र करून सुसज्य संग्रहालय हळपावत यांच्याकडे तयार झाले आहे. काही वस्तू स्वतःच्या जमापुंजीमधून घ्याव्या लागल्या तरीही हळपावत यांनी आपला छंद सोडला नाही.

हळपावत यांच्या गणेश दालनात सर्वात लहान गणपती १.५ से.मी.चा आहे. हा नागबंद गणेश असून नागाचा विळखा गणेशाचा पोटाला आहे. तर सर्वात मोठा गणपती हा २३ से.मी.आहे. हा दशभुजा गणेश उभा आहे, याची सोंड डावीकडे असून सुबक मूर्ती साकारण्यात आली आहे. शहाळ्यावर कोरलेला गणपती या संग्रहाचे आणखी एक आकर्षण आहे. यात कुठही जोड देण्याचे काम झाले नाही.

काचेचा गणपती, लाकडी गणपती, स्वयंभू गणेश, तांत्रिक गणेश, सातवाहन कालीन दगडी गणेश, कसोटीच्या दगडात कोरलेला गणेश, कौलारूत कोरलेला १०० वर्षा पूर्वीचा टेराकोटा गणेश, सनई वाजवणारा, ढोल वाजवणारा गणपती, निद्रास्त गणपती, मक्याच्या कनसामध्ये कोरलेला गणपती, सहा सोंडेचा, अष्टभुजांचा गणपती, सुपारीमध्ये कोरलेला गणपती सगळ्याचे आकर्षण ठरतो. यात कोणताच गणपती एकसारखा नाही.

५० पेक्षा अधिक गणपतीचा संग्रह हळपावत यांच्याकडे आहे. नुकताच २०१८ मध्ये हळपावत कुटुंबीयांनी आपला अनमोल संग्रह सर्वांना पाहता यावा या उद्देशाने कोणताही मोबदला न घेता अहमदनरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास भेट दिला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, डॉ. रवींद्र साताळकर यांनी तो स्वीकारून अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात पोपटलाल संजय हळपावत या नावाने दोन दालने आणि एक नाणी संग्रह सुरु केला आहे .

हळपावत यांचा संग्रह पर्यटक, अभ्यासक यांना पाहण्यासाठी खुला केलेला आहे. अशा या दानशूर व्यक़्तिमत्वामुळेच अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयाचे नावलौकिक साऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे.

संकलन – प्रा.डॉ. संतोष यादव (अहमदनगर संग्रहालय)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh | इन्कम टॅक्सकडून अनिल देशमुख यांच्या घरावर छापा

‘दादा गाली देते हे, तारीफ भी करते हें’