in

Happy Anniversary | माधुरी दीक्षित नेने यांच्या लग्नाचा आज 22 वा वाढदिवस

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने आणि तिचे पती श्रीराम नेने आज यांच्या लग्नाचा 22 वाढदिवस साजरा करत आहेत.

या विशेष प्रसंगी माधुरीने इंस्टाग्रामवर नेने आणि त्यांच्या आयुष्यातील 22 वर्षे त्यांनी कसे काढले याबद्दल विविध फोटोंचा वापर करुन एक सुंदर असा विडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये माधुरीच्या लग्नाचे देखील फोटो आहेत. त्यांनी ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाचे टायटल ट्रॅक व्हिडिओचे पार्श्वसंगीत म्हणून निवडले असून “22 Magical years of togetherness @drneneofficial ❤️” असे कॅप्शन विडीओला दीला आहे.

माधुरीने 1999 मध्ये डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. ती अमेरिकेत स्थलांतरित झाली आणि तेथे 10 वर्षांपेक्षा अधिक काळ राहिली. या जोडप्याचा पहिला मुलगा अरिनचा जन्म 2003 मध्ये झाला आणि दुसरा मुलगा रयानचा जन्म 2005 मध्ये झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रणवीर -दीपिका लवकरचं देणार गुड न्युज, रणवीरने केला खुलासा

महाराष्ट्रात ‘या’ 22 जिल्ह्यांत पावसाची शक्यता, येलो अलर्ट जारी