in

Happy Birthday Amitabh Bacchan यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद (आताचे प्रयागराज) इथे झाला. गेली 5 दशकं अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पण हे सगळं करताना त्यांना अनेक उतार चढावांचा सामना करावा लागला.

बॉलिवूडमध्ये बिग बी आजही ‘अँग्री यंग मॅन’ या नावानेही ओळखले जातात. शहेनशाह, महानायक अशा अनेक नावांनी त्यांची ओळख आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांना तितक्याच जवळच्या वाटतात.

अमिताभ बच्चन यांचे पिता हरिवंश राय बच्चन प्रसिद्ध कवि होते. त्यांच्या आईचं नाव ‘तेजी बच्चन’ असं होतं. अमिताभ यांचं नाव आधी ‘इंकलाब’ ठेवण्यात आलं होतं. पण हरिवंश राय बच्चन यांचे मित्र सुमित्रानंदन पंत यांच्या सांगण्यावरुन त्यांचं नाव ‘अमिताभ’ ठेवण्यात आलं.

अमिताभ यांना आधी इंजिनिअर व्हायचं होतं. त्यानंतर त्यांना एअरफोर्समध्ये जाण्याची आवड निर्माण झाली. पण अखेर अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘महानायक’ झाले. इंजिनिअरिंग आणि एअरफोर्सचं स्वप्न पूर्ण होत नाही हे बघून अमिताभ बच्चन यांनी कोलकत्याची वाट धरली. तिथे त्यांना शिंपिग अँड फ्रेट ब्रोकर कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्या काळात अमितजींना फक्त 500 रुपये पगार मिळायचा.

1962 ते 1969 या काळात अमिताभ बच्चन कोलकत्यामध्ये राहिले. पण त्यानंतर नोकरी सोडून ते मुंबईला आले. मुंबईत कामाच्या शोधात असतानाच त्यांना त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्थानी’ मिळाला. आणि इथूनच सुरुवात झाली, एका महानायकाच्या फिल्मी करिअरला.काळात अमिताभ बच्चन कोलकत्यामध्ये राहिले. पण त्यानंतर नोकरी सोडून ते मुंबईला आले. मुंबईत कामाच्या शोधात असतानाचा त्यांना त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्थानी’ मिळाला. आणि इथूनच सुरुवात झाली, एका महानायकाच्या फिल्मी करिअरला.

हरिवंश राय बच्चन यांच्यासारख्या नावाजलेल्या कवीचा मुलगा असूनही अमिताभ बच्चन यांना खूप मोठा स्ट्रगल करावा लागला. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांचे 12 सिनेमे फ्लॉप झाले होते. पण अमितजींनी धीर सोडला नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 12 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात ‘जंजीर’ हा सिनेमा आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट झाला. आणि मग त्यांच्या करिअरच्या गाडी खऱ्या अर्थाने रुळावर आली.

अमितजींचं फिल्मी करिअर एकीकडे सुरू होतं तर दुसरीकडे त्यांनी स्वत:चा व्यवसायही सुरू केला होता. पण यात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा बंगलही त्यांना गहाण ठेवावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या हातात ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC)सारखा छोट्या पडद्यावरचा ‘मोठा’ शो आला. एखाद्या सुपरस्टारने छोट्या पडद्यावर काम करणं त्यावेळी तेवढं कौतुकास्पद मानलं जायचं नाही. पण अमितजींना हा शो हिट करुन दाखवला. आणि त्यांच्यानंतर अनेक मोठे सेलिब्रिटी रिआलिटी शोमधून छोट्या पडद्यावर काम करू लागले.अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा आवाज ऑल इंडिया रेडिओने रिजेक्ट केला होता. पण अमितजींनी संघर्ष सोडला नाही. आज त्यांचा आवाज अनेक चित्रपट, जाहिराती, डॉक्युमेंट्री आणि गाण्यांमधूनही आपल्यापर्यंत पोहचत आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नैतिकता असेल तर शेतकऱ्यांना पॅकेज घोषित करा – देवेंद्र फडणवीस

पूँछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, 5 भारतीय जवान शहीद