in

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या संघर्षाची कहाणी एकदा वाचाच…!

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनधास्त आणि बेधडक राखी सावंतचा आज वाढदिवस.राखी सध्या बॉलिवूडपासून काहीशी दूर असून ती आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आज तिच्या संघर्षाची खरी कहाणी जाणून घेऊयात..

  • राखीचे खरे नाव नीरू भेडा असून इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचे नाव बदलून राखी सावंत असे ठेवले.
  • ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. नंतर बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम साँग दिले.
  • वयाच्या 10व्या वर्षी 50 रुपयांसाठी तिने टीना अंबानी यांच्या लग्नात लोकांना जेवण वाढले होते.
  • राखीने एकदा सांगितले होते की, तिचे कुटुंब खूप गरीब होते. तिची आई हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती आणि वडील मुंबई पोलिसांत कॉन्स्टेबल होते.
  • एकेकाळी त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करणे देखील कठीण होते. कधी-कधी असे व्हायचे की, त्यांच्याकडे खायला अन्नही नसायचे. शेजारी त्यांना उरलेले अन्न द्यायचे.
  • फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी राखीने घरातून पैसे चोरले आणि पळून गेली होती. कारण, तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने लवकर लग्न करावे. त्या
  • राखी जेव्हा मुंबईला पोहोचली तेव्हा, अनेक निर्मात्यांसमोर नृत्य सादर करत. मात्र, त्यावेळी सर्व लोक तिच्याकडे वाईट नजरेने पाहत.
  • राखीला तिच्या दिसण्यामुळे अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. मग आपलं रूपडं बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
  • राखीला ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देश में गंगा रहा है’, ‘ये रास्ते में’ अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
  • 2005 साली आलेल्या ‘परदेसिया’ या गाण्याने खरी ओळख मिळाली. या गाण्यानंतर राखी ‘आयटम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वानखेडे कुटुंबाला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, नवाब मलिकांना सूचना…

सेनगाव गाव औंढा नागनाथ नगरपंचायतीचा वाजला बिगुल