in

सिल्लोडमध्ये लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान

अनिल साबळे, सिल्लोड, जि. औरंगाबाद | सिल्लोड येथे हर घर दस्तक अभियान अंतर्गत शहरात कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे . या पार्श्व भूमीवर जन जागृती पर विद्यार्थ्यांनी फेरी काढली होती.उपविभागीय अधिकारी संजय मोरे यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन गुरुवार रोजी संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासनाच्या ‘हर घर दस्तक’ अभियान अंतर्गत सिल्लोड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकणास सुरुवात झाली आहे. या अभियानात शहरातील सर्व शाळांनी सहभागी होवून शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरात फेरी काढून कोरोना लसीकरणा बाबद जनजागृती केली

हर घर दस्तक कोरोना लसीकरण अभियान अंतर्गत शहरात एकूण 6 बूथ करण्यात आले आहेत. शहरातील जामा मस्जिद ( छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ) परिसर, रहेमानिया मस्जित समोर, बालाजी हॉस्पिटलजवळ, शिक्षक कॉलनी भागातील सिद्धेश्वर महाराज चौक, टिळक नगर भागातील कालिंका माता मंदिर, औरंगाबाद नाका परिसरातील चर्च परिसर या भागात 6 बूथ करण्यात आले असून या माध्यमातून संपूर्ण शहरात 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट नगर परिषद तसेच शासकीय यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक, ट्रॅक्टरसह दहा दुचाकी जप्त

शहीद दौडचे सातारा जिल्ह्यात आगमन