in

या राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात;६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनामुळे देशात आतापर्यंत ४ लाख २३ हजार ८१० लोकांना जीव गमवावा लागलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा महाविद्यालय बंदच ठेवण्यात आली आहेत. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

हरियाणामध्ये शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला आहे. फतेहबादमध्ये सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.या मुलांना सध्या घरी आयसोलेट केल आहे. विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तिसऱ्या लाटेचा धोका तोंडावर असून या लाटेचा धोका अधिक जास्त लहान मुलांना आहे असं सांगितलं जातंय. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणं गरजेचे आहे, नाहीतर खूप धोका वाढेल,आपल्या देशातील कमीतकमी १० टक्के लोकसंख्येच लसीकरण करण गरजेच आहे अस आवाहन WHO ने केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इटलीच्या ‘जीफोनी’ महोत्सवात ‘येरे येरे पावसा’

उद्योगमंत्री असताना प्रकल्प जनतेच्या माथी मारला, कळणे मायनिंगवरून राणेंवर निशाणा