in

ऐकलं का; कंपनीला पाठवलं ९० कोटी रुपयांचं वीजबिल

हरयाणामधील सिरसामध्ये वीज विभागाने घातलेल्या एका गोंधळाची जोरदार चर्चा असून याबद्दल वाचून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. येथील कलांवली परिसरामधील एका राईस मिलला वीज कंपनीने तब्बल ९० कोटी रुपयांचं बिल पाठवलं आहे. अर्थात ही गोष्ट तांत्रिक गडबडीमुळे झाल्याचं वीज विभागाने नंतर स्पष्ट केलं आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये बंद पडलेल्या या राईस मीलला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल पाठवण्यात आल्याने राईस मीलच्या संचालकांची झोपच उडाली. सामान्यपणे कंपनीचं बिल हे पाच ते सहा लाखांपर्यंत येतं. मात्र नुकतच त्यांना ९०.१३७ कोटींचं बिल वीज विभागाने पाठवलं.

९० कोटी हा बिलाचा आकडा वीज वापराशी हा काहीही संबंध नसणारा आहे, असंही संचालकांनी म्हटलं आहे. करोना लॉकडाउनमुळे मागील अनेक महिन्यांपासून राईस मील आणि इतर छोटेमोठे उद्योग हे पूर्णपणे किंवा काही प्रमाणात बंद असल्याने आधीप्रमाणे या कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वीज वापर होत नाहीय. तरीसुद्धा एवढ्या मोठ्याप्रमाणात बिल कसं आलं याबद्दल राईस मीलच्या अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shivsena Foundation Day: शिवसेनेचा आज वर्धापनदिन! उद्धव ठाकरे काय बोलणार?

सोशल मिडियावर गाव विकासाची चर्चा