in

‘चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी’

आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ममता दीदींचं अभिनंदन केलं. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना धमकी दिली. तुम्ही जामिनावर आहात, जास्त बोलू नका, अशी धमकी योग्य नाही. भाजपच्या हातात सीबीआय, ईडी आहे याचा गैरवापर करताना दिसत आहेत. त्यामुळे पाटील यांनी भुजबळांची माफी मागावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

एनआयएने अद्यापही अंबानी प्रकरणात कोण आहे, हे सांगितले नाही. परमबीर सिंगांची तत्काळ चौकशी केली पाहिजे, असंही मुश्रीफ म्हणाले. यड्रावकर यांना रश्मी शुल्का यांनी २० कोटीची लालच दाखवली होती. परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डबरोबर संबध आहेत त्यांची चौकशी व्हावी, असंही ते म्हणाले.

पवार साहेब, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तोपर्यंत सरकारला धक्का बसणार नाही. हे एकत्र असतील तर 25 वर्ष सरकार टिकणार, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पंढरपूरचा पराभव आम्ही स्वीकारतो आमची रणनीती थोडी चुकली ती नक्की सुधारू. तसंच गोकुळमध्ये आम्हीच बाजी मारू असंही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BIG BREAKING : कोरोनामुळे आयपीएलचे सर्व सामने रद्द

IPLला स्थगिती; हंगाम पूर्ण करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार