in

कास पठाराजवळच्या दरीत तब्बल २५ तास तो देत होता मृत्युशी झुंज

प्रशांत जगताप | जागतिक निसर्ग वारसा स्थळ असलेल्या कास पठाराजवळ, गणेशखिंड येथे सेल्फी काढण्याच्या नादात २२ वर्षांचा तरुण दरीत कोसळला. त्याला तब्बल २५ तासानंतर दरीतून काढण्यात साता-याच्या रेस्क्यू टीमला यश आले.

कनिष्क सचिन जांगळे (वय २२, रा. यादोगोपाळ पेठ, समर्थमंदीर सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे. काल सायंकाळी तो कास रस्त्यावर फिरायला गेला होता. यवतेश्वरजवळच्या गणेशखिंडीत तो कड्याच्या बाजूला गेला. सेल्फी काढत असताना तो दरीत कोसळला. काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी.कुटुंबियांनी शोधाशोध केली असता गणेशखिंडीतील मंदीराजवळ त्याची दुचाकी आढळली. दरीत शोध घेतला असता सुमारे ६०० फुटांवर कोणीतीरी पडले असल्याचे लक्षात आले. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमच्या जवानांनी आज परिस्थितीची पाहणी व मदत कार्याच्या साहित्याची जुळवाजुळव करुन दुपारी ३ वाजता मदत कार्य सुरु केले. एक जवान खोल दरीत उतरला. क्रेनच्या सहाय्याने जखमी युवकाला बाहेर काढण्यात रात्री साडेसात वाजता यश आले. तब्बल २५ तास हा युवक जखमी अवस्थेत दरीमध्ये पडून होता.
पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात भरती केले.

बचाव कार्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु टीमचे विक्रम पवार (पापा), चंद्रसेन पवार, देवा गुरव
सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ व अभिजित शेलार यांनी सहभाग घेतला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ajit Pawar | दोन्ही डोस झालेल्या सर्वांना माझी विनंती आहे की …

चंद्रपुरात दारुबंदी उठविणा-या पालकमंत्री वडेट्टीवार यांची पूजा