in

Maharashtra Health Dept Exam Date Update | आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

गेल्या काही दिवसांपुर्वी परीक्षेच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवीन तारखांच्या 9 दिवसांपुर्वी हॉल तिकीट दिले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या गट क ची येत्या 24 ऑक्टोंबरला परीक्षा होणार आहे. तर गट ड ची 31 ऑक्टोंबरला परीक्षा होणार आहे. या परीक्षांच्या नव्या तारखांच्या 9 दिवसांपुर्वी हॉल तिकीट दिले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anant Geete | रायगडमधील गुप्त बैठक संपली; सेना-राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल

BJP-MNS Alliance | अखेर ‘या’ जिल्ह्यात झालीच भाजप-मनसेत युती