in

आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू

रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आर्यन खानच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले आहे. आर्यनसह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले आहे. या अर्जावरील सुनावणी सध्या सुरू आहे. आर्यनचा जामीन जामीन फेटाळण्यात आला तर आर्यन खानला किमान 14 दिवस तुरुंगात जावे लागेल.

नार्केटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यनसह इतर आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टात केली होती. पण ती मागणी फेटाळण्यात आली आहे. आतापर्यंत चौकशीदरम्यान एकूण 11 जणांना अटक केल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.

सरकारी वकील कोर्टात म्हणाले, “आरोपींकडून अधिक माहिती मिळाली आहे. आर्यन खान आणि अरबाज यांच्याकडून अर्चित कुमार याचे नाव समोर आले. अर्चित सप्लायर असून त्याच्याकडून 6 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अर्चित गांजा नेटवर्कमध्ये सहभागी आहे.”

मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री छापा टाकला होता. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने ताब्यात घेतलं. NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत आर्यन खानसह इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली.

3 ऑक्टोबर रोजी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली असा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

न्हावा शेवा बंदरातून सव्वाशे कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त

महिला गिर्यारोहकांकडून गंगोत्री-1 शिखर सर