in ,

आर्यन खानच्या याचिकेवर आज सुनावणी

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज पुन्हा एकदा विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी होत आहे. या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसल्याच्या कारणाने दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात आले आहे.

दरम्यान, ड्रग्स प्रकरणातील आरोपी आर्यन खानला कालची रात्र तुरुंगात काढावी लगली. बुधवारी त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी जवळपास तीन तास चालली आणि कोणताही निर्णय आला नाही. न्यायालयाने आता यावर आज सुनावणी घेण्याचे म्हटले आहे. हे प्रकरण आता आज सकाळी ११ नंतरच सुनावणीसाठी येईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात २ हजार २१९ नवीन बाधित

नगरसेवकाला तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना अटक