कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यभरात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यानंतर कालपासून राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली आहे.
मुंबई, मुंबई-उपनगर, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्याचे वृत्त आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.
हिंगोली अमरावती आणि नाशिकमध्ये जोरदार वादळी पाऊस झाला आहे. त्याच प्रमाणे सातारा नंदुरबार धुळे, जालना या जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याचे निदर्शनास आले. अमरावतीत वर्फाची शुभ्र चादर पसरली होती. मेळघाटात सर्वदूर पाऊस कोसळत असताना खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट झाली. या गारपीटीनंतर परिसराला काश्मीरचे स्वरुप प्राप्त झाले होते.
Comments
Loading…