in

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १३ जून आणि १४ जून रोजी अतिवृष्टीचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात १४ जून २०२१ या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

समुद्र किनारी आणि धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. गरज नसल्यास लोकांनी देखील घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. एनडीआरएफ देखील आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लातूरात पुढील आदेशापर्यंत विकेंड लॉकडाऊन नाही

Lokshahi Impact; लोकशाहीच्या बातमीनंतर हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल